१८ डिसेंबरला रात्री अकरा वाजता च्या सुमारास आरोपी शेख फारुण शेख इस्माईल हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास रेती नदीपात्रातून चोरी करून घेऊन जात असताना पोलिसांना मिळून आला असता आरोपीच्या ताब्यातून रेती व ट्रॅक्टर असा एकूण पाच लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच 19 डिसेंबरला घाटंजी पोलिसात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.