पुरंदर: आईच्या मोबाईलवर व्हॉट्सअँप मेसेज केल्याच्या कारणावरून पाठरवाडी येथे एकाला मारहाण
Purandhar, Pune | Apr 23, 2024 पुरंदर तालुक्यातील पठारवाडी येथे आईला व्हाट्सअप वर मेसेज केल्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी हनुमंत नामदेव साळुंखे यांनी आरोपी स्वप्निल संभाजी ढवळे आणि अक्षय भाऊसो कटके यांच्या विरोधात सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे. या मारहाणीत त्यांना गंभीर दुखापत झाली असून या घटनेचा अधिकचा तपास सासवड पोलीस करत आहेत.