महाड: रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का.भरत गोगावले यांचे निकटवर्तीय सुशांत जाबरे शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत.
Mahad, Raigad | Nov 2, 2025 रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघाली आहेत. शिवसेना शिंदे गटाचे प्रभावक्षेत्र मानल्या जाणाऱ्या महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी थेट मंत्री भरत गोगावले यांच्या गोटात मोठी घुसखोरी करत मोठा राजकीय डाव साधलाय. भरत गोगावले यांचे निकटवर्तीय व महाडमधील युवा उद्योजक सुशांत जाबरे यांनी आज शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.