सडक अर्जुनी: कन्हाळगाव- महालगाव रस्ता बांधकामाचे भुमिपूजन संपन्न
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दळणवळण व सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रस्तावित असलेल्या विकासकामाचे भुमिपूजन महिला व बालकल्याण सभापती पोर्णिमाताई ढेंगे यांच्या हस्ते ता.८ जानेवारी ला उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोर्णिमाताई ढेंगे होत्या. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “महिला व बालकांच्या विकासासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.