संगमनेर: संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी राळेगण सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली.
संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी राळेगण सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मार्गदर्शनासाठी ही भेट विशेष महत्त्वाची ठरली. या भेटीदरम्यान अण्णा हजारे यांनी आमदार अमोल खताळ यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांनी सांगितले की, “राजकारण हे सत्तेच्या मोहासाठी नसून जनसेवेच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवण्यासाठी असते. आजचा तरुण नेता जर मूल्यनिष्ठ आणि प्रामाणिक राहिला, तर त्यातून समाजाचा खरा विकास साध्य होऊ शकतो.”