चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील हिंदी सिटी हायस्कूलमधील मतदान केंद्रावर काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा
चंद्रपूरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. हिंदी सिटी हायस्कूलमधील मतदान केंद्रावर राडा झाला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी राडा केल्यामुळे मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर विरुद्ध भाजपचे सुधीर मुंगंटीवार यांच्यात लढत होत आहे. हिंदी सिटी हायस्कूल मतदान केंद्रावर प्रतिभा धानोरकर यांच्या नावासमोर कॅन्सल असं लिहिल्याने हा राडा झाला.