खालापूर: मनोज जरांगे पाटील यांना उपोषणास पाठींबा देण्यासाठी खोपोली येथे पार पडली सकल मराठा समाज बांधवांची नियोजन बैठक
मनोज जरांगे पाटील येत्या 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदान या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी करिता पुन्हा एकदा मुंबईत येऊन आमरण उपोषण करणार आहेत.त्यांना पाठिंबा देण्याकरिता खालापूर तालुका व खोपोली शहर सकल मराठा समाज बांधव यांनी नियोजन बैठकीचे आयोजन खोपोली शहरात केले होते.