पोलीस स्टेशन खापा हद्दीत येणाऱ्या रायवाडी गावाजवळ आज सकाळी सुमारे ११ वाजताच्या दरम्यान भरधाव पिकअप वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक देऊन चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची घटना घडली. या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत.*मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकल क्रमांक MP 28 BC 0679 वरून सनकलाल धुर्वे हे खामरपणी गावावरून सावनेरकडे येत असताना पिकअप वाहन चालकाने आपले वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवत मोटारसायकलला धडक दिल