राहुरी: बुधवारी राहुरीमध्ये भाजपाचा भव्य कार्यकर्ता मेळावा, तालुका मंडल अध्यक्ष विक्रम भुजाडी यांची माहिती
राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचा ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी निर्धार केला आहे. आगामी होणा-या पोटनिवडणुकीपूर्वीच कार्यकर्त्यांच्या विचार जाणून घेण्यासाठी बुधवारी दुपारी ३ वाजता राहुरी शहरातील पांडुरंग कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीचा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहीती तालुका मंडल अध्यक्ष विक्रम भुजाडी यांनी दिला आहे.