विक्रमगड: राष्ट्रीय महामार्गावर वसई परिसरात मुसळधार पावसामुळे दृश्यमानतेवर परिणाम
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसई वासपासच्या परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावरील दृश्यमानतेवर परिणाम झाला. अतिशय मुसळधार पावसामुळे समोरील वाहन दिसणे वाहन चालकांना कठीण झाले. यामुळे महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू असल्याचे पहावयास मिळाले.