रावेर: खिर्डी ते रेंभोटा रस्त्यावर गोवंश वाहतूक करणारे वाहन पकडले, एक लाख ५२ हजाराचा मुद्देमाल जप्त,निंभोरा पोलीसात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Dec 13, 2025 रावेर तालुक्यात खिर्डी हे गाव आहे. या गावातून रेंभोटा जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावरून सय्यद अजहर सय्यद अजगर हा वाहन क्रमांक एम. एच. ४० ई.बी.०३९७ याद्वारे गोवंश वाहतूक करत होते. याची माहिती पोलिसांना मिळाली पथक त्या ठिकाणी गेले त्यांनी वाहन आणि गोवंश असा एकूण एक लाख ५२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.