कोरेगाव तालुक्यातील शिरढोण येथे शौचालय पाडल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणातील आंदोलकांची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुरुवार, दिनांक १८ डिसेंबर रोजी रात्री अंधारात मोबाईलच्या बॅटरीच्या प्रकाशात आरोग्य तपासणी केली. उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची पाहणी करताना आवश्यक वैद्यकीय नोंदी घेण्यात आल्या. मात्र परिसरात योग्य प्रकाशव्यवस्था नसल्याने मोबाईलच्या बॅटरीचा वापर करावा लागल्याने प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.