मालसाने (ता. चांदवड) येथे 6 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या णमोकार तीर्थ महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित विभागांनी आपापली कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी गर्दी व्यवस्थापन, वाहनतळ, वीज, पाणी, शौचालय, आरोग्य सुविधा व स्वयंसेवकांचे नियोजन करण्यावर भर दिला. णमोकार तीर्थ हे नवीन धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार असून कुंभमेळ्याच्या धर्तीवर नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.