कळमेश्वर: घोराड येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त भव्य पालखीचे आयोजन
कळमेश्वर तालुक्यातील घोराड येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त भव्य पालखीचे आयोजन आज शनिवार दिनांक 31 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास करण्यात आले. यावेळी टाळ मृदंगाच्या साह्याने गावकरी या पालखीमध्ये सहभागी झाले. गावकऱ्यांनी पालखीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला