नंदुरबार: जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलीस यंत्रणा सुरक्षेसाठी सज्ज आहे : संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार
नंदुरबार शहरात सिंधी कॉलनी परिसरात घडलेल्या वैयक्तिक वादातील घटनेमुळे नंदुरबार शहरात कुठल्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. नंदुरबार जिल्हा पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज आहे. सदर घटनेतील आरोपींना अटक करण्यात आले असून या घटनेला कुठलेही वेगळे वळण देण्यात येऊ नये अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी दिली आहे.