चंद्रपूर: सुमठाणा येथे अवैधरित्या रेतीतस्करी करणारे वाहन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी पकडले,चार जणांना अटक
चंद्रपुरातील सुमठाणा येथे अवैधरित्या रेतीतस्करी करणारे वाहन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी मंगळवारी पहाटे चार वाजता पकडले असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. आनंद येवले, कुमार सोयाम, संतोष गुरनुले, दिनेश सोयाम असे अटकेतील आरोपींची नाव आहेत. या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.