संग्रामपूर: सोनाळा येथे मॅगझीनसह ५ पिस्टल,१६ जिवंत काडतूससह ७ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त आरोपींना पोलीस कोठडी
संग्रामपूर तालुक्यातील राज्य महामार्गावरील सोनाळा गावाच्या सोनाजी नगर येथे २७ आक्टोबर रोजी रस्त्यावरच सोनाळा पोलीसांनी कारवाई करत एमपीतून भरधाव येत असलेल्या स्वीप्ट डिझायर कार मधून मॅगझीनसह ५ पिस्टल १६ जिवंत काडतूस सह ७ लक्ष ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून २ जणांना ताब्यात घेतले तर एक जण फरार झाला.याप्रकरणी मोहम्मद नफीज अकील अली, मोहम्मद उबेद रजा मोहम्मद अल्फाज विरुद्ध सोनाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.