धुळे: धुळ्यात दिव्यांचा महासागर! बीएपीएस स्वामीनारायण मंदिर ३ हजार पणत्यांनी उजळले; डोळे दिपवणारे दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद!
Dhule, Dhule | Oct 19, 2025 धुळे: दिवाळी म्हणजे अंधारावर मात करून प्रकाशाचा विजय साजरा करण्याचा सण... आणि याच प्रकाशाच्या उत्सवाचं एक अत्यंत भव्य आणि दिव्य रूप पाहायला मिळालं धुळे शहरातील बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात. दिवाळीच्या मुहूर्तावर आयोजित दीपोत्सवात तब्बल ३ हजारांहून अधिक दिव्यांनी मंदिराचा संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. जमिनीवर पणत्यांची आकर्षक आरास आणि त्यामुळे आसमंतात पसरलेला लखलखाट पाहून भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.