लाखनी: एकाचा जागीच, दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू; सायता नगरात भीषण दुर्घटना
सायता नगर येथील वनविभाग कार्यालयासमोर सोमवारी (24 नोव्हेंबर) रात्री सुमारे 8 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला. धडक इतकी जोरदार होती की, अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. जखमीला तत्काळ उपचारासाठी अड्याळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचाही मृत्यू झाला. मृतांपैकी एकाची ओळख गणेश नीलकंठ मारबते (वय 32, पुनर्वसन) अशी करण्यात आली आहे.