खापरी येथील आरोग्य सेवा सत्राला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भोसीकर यांची आकस्मिक भेट.
9.3k views | Yavatmal, Maharashtra | Jun 13, 2025 यवतमाळ : जिल्हा आरोग्य अधिकारी मा.डॉ. सुभाष ढोले यांचे मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साईनाथ भोसीकर यांनी खापरी तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ येथील नियमित आरोग्य व पोषण दिनाच्या दिवशी आयोजित आरोग्य सेवा सत्राला आकस्मिक भेट देऊन लसीकरणाबाबतची माहिती घेतली व पूरक आहाराबाबत उपस्थित गर्भवती व स्तनदा माता तसेच इतर नागरिकांना मार्गदर्शन करून स्टॉप डायरिया कॅम्पेन बाबत माहिती दिली. तसेच ग्रामपंचायतला भेट देऊन ब्लिचिंग पावडर साठा बाबत माहिती घेतली व नियमित पाणी शुद्धीकरणाबाबत सूचना दिल्या.