छत्रपती संभाजीनगरात लाल बावटा शेतमजूर व गायरान धारकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 6, 2025
आज दिनांक 6 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर च्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाल बावटा शेतमजूर आणि गायरान धारकांनी आज एकदिवसीय धरणे आंदोलन केले. राज्य सरकार शेतकऱ्यांना मिळालेल्या नुकसानीची भरपाई देत असताना, गायरान धारकांनाही तशीच भरपाई देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच सर्व गायरान जमिनी गायरान धारकांच्या नावे करण्यात याव्यात आणि राज्यभर सरसकट दुष्काळ जाहीर करावा, अशा इतर मागण्याही यावेळी करण्यात आल्या.