नरखेड: नरखेड येथे माल गोडाऊनच्या स्लॅबवर जुगार खेळणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
Narkhed, Nagpur | Oct 16, 2025 15 ऑक्टोबरला रात्री सात वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार नरखेड पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नरखेड येथील राहणारा आरोपी सागर महंत यांच्या मालकीच्या गोडाऊनच्या स्लॅबवर जुगार खेळणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींकडून रोख रक्कम मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख 12 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मोहसीन शेख, सागर महंत, सुधाकर भोंगाळे लोकेश कडाळे महेंद्र ढोके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.