जळगाव शहरातील तांबापूरा भागात काहीही कारण नसतांना एका मजूराला शिवीगाळ करून मारहाण करून दमदाटी केल्याची घटना रविवारी १४ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी सोमवारी १५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.