बसमधून उडी घेत महिलेची आत्महत्या चेहऱ्यावरून चाक गेल्याने ओळख पटवण्याचा प्रयत्न
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 29, 2025
आज दि 29 ऑक्टोबर संध्याकाळी पाच वाजता धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण प्रकार घडला असून बसमधून उडी घेत एका महिलेने आत्महत्या केली आहे. कन्नड ते छत्रपती संभाजीनगर या एसटी बसमधून गल्लेबोरगाव परिसरात चालत्या बसमधून त्या महिलेने अचानक उडी घेतली. दुर्दैवाने तिच्या चेहऱ्यावरून बसचे चाक गेल्याने जागीच तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर बसचालकाने वाहन थांबवून पोलिसांना माहिती दिली. महिला काहीशी तणावात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून खुलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घ