फलटण: फलटणमध्ये प्रशासकीय दहशत चालू दिली जाणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट इशारा
Phaltan, Satara | Nov 28, 2025 फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभेत उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी प्रशासनासह विरोधकांना थेट इशारा दिला की, फलटणमध्ये प्रशासकीय दहशत कोणालाही चालू देता येणार नाही. चुकीचे काम करणाऱ्यांची गाठ माझ्याशी आहे आणि माझ्या एकाही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे ते स्पष्टपणे म्हणाले. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता झालेल्या या सभेत राजे गटाने अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला.