चंद्रपूर महानगरपालिके अंतर्गत कार्यरत नालीसफाई कामगारांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी महानगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्थीने कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून कामगारांनी आंदोलन 17 ऑक्टोंबर रोज शुक्रवारला दुपारी तीन वाजता च्या दरम्यान मागे घेतले