रत्नागिरी: सत्कोंडी येथील पायावटेवर चिरेबंदी पाखाडीवर घसरुन पडलेल्या प्रौढाचा मृत्यू; साधारण पाच तासाने निदर्शनास आली घटना
रत्नागिरी तालुक्यातील सत्कोंडी येथील पायावटेवर चिरेबंदी पाखाडीवर घसरुन पडलेल्या प्रौढाला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. प्रवीण लक्ष्मण शिगवण ( ४७, रा. सत्कोंडी शिगवण वाडी, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना रविवार १४ सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते पावणे दोन च्या सुमारास सत्कोंडी जाणाऱ्या पायवाटेवरचे चिरेबंदी पाखाडीवर निदर्शनास आली. प्रविण शिगवण हे नेहमीप्रमाणे घरातून निघून गेले होते.