चंद्रपुरातील ब्रम्हपुरी शहरातील देलनवाडी मतदान केंद्र येथे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांनी शुक्रवारी मतदानाचा हक्क बजावला. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील सर्व मतदारांना आवाहन करतो की त्यांनी सुद्धा मतदान करून लोकशाहीच्या उत्साहात आपला सहभाग नोंदवावा, असं वडेट्टीवार म्हणाले.