धुळे जिल्ह्यात वर्धा येथील गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांच्या अटकेच्या निषेधार्थ प्रशासकीय वातावरण पुन्हा तापले आहे. ४ आणि ५ डिसेंबरच्या लाक्षणिक संपानंतरही शासनाने ठोस निर्णय न घेतल्याने सर्व बीडीओ आजपासून बेमुदत सामूहिक रजेवर गेले आहेत. डीएससी वापरासंबंधी स्पष्ट धोरण नसणे आणि परवानगीशिवाय अटकेविरोधात असंतोष असून, शासन संरक्षण मिळेपर्यंत कामबंद आंदोलन सुरू राहणार आहे.