गोरेगाव: ग्रामपंचायत बोरगाव सुकपुर येथे तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत खेमलाल पटले विजयी
दि.15 सप्टेंबर रोजी 11 ते 5 वाजेच्या दरम्यान ग्रामपंचायत बोरगाव सुकपुर येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत खेमलाल पटले यांचा 61 मतांनी विजय झाला. लोकशाही पद्धतीने बॅलेट पेपरवर यावेळी गुप्त मतदान घेण्यात आले. अत्यंत चुरशीचा झालेल्या या निवडणुकीत खेमलाल पटले यांचा विजय झाला. ग्रामसेवक सूर्यवंशी, सरपंच मनीषा चोपकर यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवडणूक पार पडली.यावेळी ढोलताशाच्या गजरात गुलाल उधळून भव्य विजयी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.