सेलू शहरातील काँग्रेस कमिटीच्या वतीने जय संताजी दिनदर्शिकेचे प्रकाशन थाटात करण्यात आले. हा कार्यक्रम बुधवार, दिनांक ७ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता तालुका काँग्रेस कार्यालयात पार पडला. वर्धा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेश सचिव शेखर शेंडे यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.