कोपरगाव: शहरातील टिळकनगर शनी चौकात तीन दुकानांना भिषण आग, लाखो रुपयांचे नुकसान
कोपरगाव शहरातील टिळकनगर, शनी चौक भागातील तीन दुकानांना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात कारणाने आग लागली असून यात दुकानी जळून खाक झाले आहे यात तिन्ही दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. सदरची घटना 11 ऑक्टोबरच्या मध्य रात्री 2 ते अडीचच्या दरम्यान घडली आहे.नुकसानग्रस्त दुकानांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी दुकानदारांनी केली आहे.