संगमेश्वर: देवरूखातील सुवर्ण व्यावसायिकाच्या लुटीप्रकरणी पोलीसांनी प्रसिद्ध केले संशयिताचे रेखाचित्र
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील सुवर्ण व्यावसायिकाचे अपहरण करून त्यांच्याकडील १४ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने लुटण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडला होता. या लुटीप्रकरणी देवरूख पोलीसांकडून संशयिताचे रेखाचित्र जारी करण्यात आले असून संशयिताचा शोध घेतला जात आहे.