यावल: श्रीराम नगरातील रहिवासी तरुणाची सायकल यावल बस स्थानकातून झाली चोरी, यावल पोलीस ठाण्यात नोंदवली तक्रार
Yawal, Jalgaon | Nov 19, 2025 यावल शहरात सातोद रस्त्यावर श्रीराम नगर आहे. या श्रीराम नगरातील रहिवाशी उमेश त्र्यंबक डांबरे याची सायकल यावल बस स्थानकामधून अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रारंभीम सायकलचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र सायकल कुठेच मिळून आली नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.