वाई: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वाई येथे मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये इनकमिंग
Wai, Satara | Oct 26, 2025 सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाढती ताकद पाहून मनस्वी आनंद झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांवर लोकांचा विश्वास वाढत आहे, हेच यातून स्पष्ट होत असल्याचे पक्ष प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले. रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वाई तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा जिल्ह्यातील मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.