भगिमायरी येथील टोल नाक्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर आज टोल नाक्यावर शेतकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चेसाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा या उद्देशाने संजय टेंभेकर व पंकज घाटोडे स्वतः टोल नाक्यावर उपस्थित झाले होते.मात्र नियोजित चर्चेसाठी NHAI चे संबंधित अधिकारी टोल नाक्यावर अनुपस्थित राहिल्याम