अर्जुनी मोरगाव: चिचोली/जुनी येथे आयोजित भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी दिली भेट
चिचोली/जुनी येथे आयोजित भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी भेट दिली. भव्य कीर्तन आणि भजनांनी वातावरण भक्तिमय झाले. सप्ताहभर चाललेल्या या कार्यक्रमात विविध कथा, प्रवचन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता. हा कार्यक्रम भक्ती, एकता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा उत्कृष्ट नमुना ठरला. अशा सोहळ्यांमुळे ग्रामीण भागातील धार्मिक जागृती वाढते आणि समाजबांधणी मजबूत होते. असे याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर म्हणाले.