सेलू: रेहकी येथे ग्रामस्थांनी नाल्यावर बांधला बंधारा; गावात राबविली स्वच्छता मोहीम, "पाणी अडवा, पाणी जिरवा’चा दिला संदेश
तालुक्यातील रेहकी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून बुधवार, दि. ३१ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता ग्रामस्थांच्या सहभागातून नाल्यावर बंधारा बांधण्यात आला. यासोबतच गावात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अभियानात गावकऱ्यांचा उस्फुर्त सहभाग.