कन्नड: पालकमंत्री शिरसाट यांनी उपोषणकर्त्यालाच घरी बोलावलं, कन्नड तहसीलवर सुरू झालेलं उपोषण संपलं मंत्र्यांच्या घरी
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी कन्नड तहसील कार्यालयासमोर १० ऑक्टोबर पासून सुरु असलेला आमरण उपोषण छत्रपती संभाजीनगर येथे सोडल्याची अजब घटना घडली.झाला असं कि अतिवृष्टिमुळे झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांना ठोस मदत मिळावी तसेच सरसकट कर्ज माफी व्हावी या मागणी साठी तहसील समोर संदीप सेठी हे १० ऑक्टोबर पासून आमरण उपोषण करित होते तहसीलदार यांच्यासह अधिकारी यांनी सेठी यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली होती मात्र पालकमंत्री शिरसाट यांच्या घरी उपोषण सोडण्यात आले