शिरूर: सकाळी कामाला जाताना पोंदेवाडी फाटा येथे दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; अपघातात तरुणाचा मृत्यू
Shirur, Pune | Sep 26, 2025 पोंदेवाडी फाटा येथे अष्टविनायक रस्त्यावर शुक्रवारी (दि. २६) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दत्तात्रय ज्ञानेश्वर गावडे (वय ३२, राहणार सविंदणे, ता.शिरूर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.