देवळी: आ.राजेश बकाने यांचा एकुर्ली गावाचा दौरा: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आणि गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
Deoli, Wardha | Sep 15, 2025 देवळी-पुलगावचे आमदार राजेश बकाने यांनी आज, १५ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता, एकुर्ली गावाचा दौरा केला. दुपारी ३ वाजता एकुर्ली ग्रामपंचायतीमध्ये आयोजित एका छोट्या कार्यक्रमात ते उपस्थित होते. या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी त्यांना भेटून आपल्या समस्या मांडल्या.अतिवृष्टीमुळे गावात झालेल्या नुकसानीची माहिती, विशेषतः शेती पिकांची स्थिती, गावकऱ्यांनी आमदारांना दिली. तसेच विविध समस्यांबाबतही गावकऱ्यांनी आमदार राजेश बकाने यांना निवेदन दिले.