भडगाव: भडगाव ते वाडे रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याने उपोषण स्थगित करण्यात आल्याबाबतची माहिती उपोषणाचा इशारा देणाऱ्याने दिली
भडगाव वार्ताहर — भडगाव ते वाडे रस्त्यावर मोठया प्रमाणात ठिकठिकाणी खड्डयांचे जाळे पसरलेले आहे. भडगाव ते कोठली, कोठली ते कनाशी, गोंडगाव ते वाडे या दरम्यान रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ करण्यात यावी अन्यथा उपोषणास बसू असा इशारा ज्येष्ठ पत्रकार अशोक परदेशी यांनी प्रशासनाला दिला होता त्यांच्या इशाराची दखल घेण्यात आली असून रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले असल्याबाबतचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे,