पारनेर: 28 ऑक्टो रोजी महाएल्गार आंदोलन पुकारले आहे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ते रवाना...,!
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती आणि शेतीमालाला हमीभाव या मागण्यांच्या पूर्ततेसाठी नागपूर येथे 28 ऑक्टोबर रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने सरकारच्या विरोधात महाएल्गार आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्यातून व पारनेर तालुक्यातून शेतकऱ्यांसह मोठ्या संख्येने नागपूरकडे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आंदोलनासाठी रवाना झाले आहेत.