नाशिकच्या हनुमान नगर चौफुलीवर अचानक झालेल्या तिहेरी अपघातात स्विफ्ट डिझायर कार दाबली गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून कार चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. नाशिक शहरातील हनुमान नगर चौफुली येथे सोमवारी रात्री ९ वाजता तिहेरी अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, म्हसरूळ परिसराकडून मुंबई,आग्रा महामार्गाकडे जात असताना चौफुलीवर अचानक एका ट्रॅव्हल्स बसमध्ये बिघाड झाला. त्यामुळे