राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना बहुतांश ठिकाणी भारतीय जनता पक्षला यश मिळाले असले, तरी जालना महानगरपालिकेच्या निकालाने राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. शुक्रवार दि. 16 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणातील संशयीत आरोपी श्रीकांत पांगारकर यांनी जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. जालना शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधून श्रीकांत पांगारकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.