यशवंतराव राणे पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कुऱ्हाडी येथील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार विजय रहांगडाले यांनी उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. नृत्य, नाट्य, गीतगायन अशा कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना यातून उत्तम व्यासपीठ मिळाले