आंबेगाव: शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने मंचर येथे सरकारविरोधात आंदोलन
Ambegaon, Pune | Sep 28, 2025 एकीकडे राज्यात पावसाने आणि पुरामुळे थैमान घातले आहे, तर दुसरीकडे शेतकरी बांधवांना त्यांच्या पिकवलेल्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. याच मुद्द्यावरून आज पुणे जिल्ह्यातील मंचर येथे शेतकऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले.