स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले आहे.नेर तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडी सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आपले उमेदवार उतरवण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक पार पडली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.