शारदीय नवरात्रोत्सवाच्या आज दुसऱ्या माळेला कोल्हापूरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महाविद्या श्री बगलामुखी रुपात आकर्षक पूजा बांधण्यात आली आहे. बगलामुखी ही दशमहाविद्या पैकी आठवी महाविद्या आहे. अमृत समुद्रामधील, मणिमंडपाच्या रत्नखचित वेदावरील सिंहासनावर पीतवर्ण वस्त्रं अलंकार धारण केलेली आहे. तिच्या एकहाती शत्रूची जीभ व एकहाती गदा धारण केलेली आहे असं देवीचं वर्णन आहे.