नगर–मनमाड महामार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी तसेच शहरातील नागरिक मोठ्या गैरसोयीला सामोरे जात आहेत. महामार्गावरील वाहतूक शहरात वळवली जात असल्याने शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही प्रचंड ताण निर्माण झाला असून नागरिकांचा मनस्ताप वाढला आहे. आज शनिवारी दुपारपासून दिवसभर महामार्गावर वाहतूक कोंडी असल्याने अनेक वाहने हे राहुरी शहरातील अन्य मार्गाने घातल्याने शहर वासियांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.